शेवटची भेट...

Posted on 5:09 AM by

तुला भेटणार म्हणून,
घेऊन आलो मी प्रेम भेट
,
पण मला काय माहीत
,
ती होती आपली शेवटची भेट॥
नेहमी सारखेच फ़िरत होतो स्वच्छंद,
तेव्हाही आठवत होता
तू दिलेला गुलकंद...
चव येत होती त्या गुलाबाची थेट,
पण ती होती आपली शेवटची भेट॥
बोलत होतीस तू तुझ्या मनातल्या भावना,
मंत्र मुग्ध होऊन मीही स्पर्शत होतो त्यांना,
तुझ्या ओठातून पोहचत होत्या थेट,
पण ती होती आपली शेवटची भेट...
तुझा तो अबोला अजुनही,
काळजात उतरतो थेट,
अशी होती आपली,
शेवटची भेट....
♫♥♫प्रशांत पवार♫♥♫

Followers

Google+ Followers

Network Blog

Popular Posts